
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या दबावामुळे 'फेंजल' नावाच्या चक्रीवादळाने तीव्र रूप धारण केले आहे. येत्या काही तासांत देशभरातील अनेक राज्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील 'फेंजल' चक्रीवादळ शनिवारी दुपारी पुद्दुचेरीजवळील किनारपट्टीवर धडकले. मात्र, त्यापूर्वीच 'फेंजल'च्या प्रभावामुळे हवामानात बदल होऊ लागला होता. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर खळबळ उडाली.