
बी.व्ही.जोंधळे
दलितांचे आजचे राजकारण व्यक्तिवाद, गटबाजी, वैचारिक तत्त्वशून्यता यांच्या दलदलीत सापडले आहे. या राजकारणाने सतत सत्तेच्या तुकड्याचे राजकारण केले. यात वंचितांचे प्रश्न दुर्लक्षित राहात आहेत.
प हिली काँग्रेस-रिपब्लिकन युती घडवून आणली होती, ती राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्याशी हातमिळवणी करून. या युतीची पार्श्वभूमी लक्षात घ्यायला हवी. त्यावेळी महाराष्ट्रात एक सांस्कृतिक संघर्ष सुरु झाला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारून जे धर्मांतर केले, त्यामुळे दलित समाजावरील अत्याचारात वाढ होऊन त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात येऊ लागले होते.