
अॅड. लक्ष्मी यादव
केरळच्या मुख्य सचिवपदी शारदा मुरलीधरन यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या रंगावरून त्यांच्यावर शेरेबाजी करण्यात आली. गोरा रंग म्हणजे श्रेष्ठ आणि काळा-सावळा रंग कनिष्ठ असा विचार आपल्या समाजामध्ये खोलवर रुजला आहे. हा विचार अतिशय चुकीचा आहे. आनंदी जगणं जात, धर्म, रंग, वंश, लिंग, दिसणे अशा कोणत्याच गोष्टींवर अवलंबून नसते, ते विचार आणि मूल्यांवर आधारित असते.