District gazetteers
esakal
Premium| Data decentralisation in India: गॅझेटियरच्या पुनरुज्जीवीकरणामुळे स्थानिक ज्ञानाचा अनमोल ठेवा प्रकाशात येवू शकतो
युगांक गोयल
प्राध्यापक, ‘फ्लेम’ विद्यापीठ
कृती भार्गव विद्यार्थिनी
विकेंद्रीकरण हेच लोकशाहीचे भविष्य असेल, तर त्यापूर्वी ज्ञानाचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. जगातील सर्वांत व्यापक डेटा व्यवस्थांपैकी असलेल्या राष्ट्रांमध्ये भारत हा प्रमुख देश आहे. मात्र, देशातील आकडेवारी आणि माहिती विखुरलेल्या स्थितीत असल्यामुळे अनेक प्रकारच्या अडचणी आहेत. ब्रिटिशांच्या काळात करण्यात आलेल्या ‘गॅझेटियर’चे महत्त्व अधिक आहे. या गॅझेटियरचे अद्ययावतीकरण करणे गरजेचे आहे.
भारतामधील नागरिकांना आकडेवारीमध्ये कायमच रस असतो. दर काही महिन्यांनी राष्ट्रीय स्तरावरची आकडेवारी बातम्यांचा मथळा होते. जीडीपी, बेरोजगारी दर, साक्षरतेचे प्रमाण, जनगणनेतील काही विश्लेषण, अशा विविध मुद्द्यांमधील आकडेवारी बातमीचा विषय होते. पण ही आकडेवारी त्यामागच्या जीवनाच्या वास्तवांबद्दल फारच कमी सांगतात. प्रत्येक टप्प्यामागे एक गोष्ट दडलेली आहे: त्रिशूरची आजी विद्यारंभमाच्या दिवशी तांदळाच्या कणांवर नातीसाठी अक्षरे काढत आहे; गडचिरोलीचे शिक्षक जंगलातील वस्तीत एकाच खोलीत शाळा चालवत आहेत; सांगलीचा शेतकरी ऊस लावण्यापूर्वी पावसाचा अंदाज तपासत आहे. या केवळ केवळ घटना नाहीत, तर एका राष्ट्राची स्पंदने आहेत. भारताचा आत्मा एकत्रित आकड्यांमध्ये नाही तर त्याच्या जिल्ह्यांमध्ये आहे. ७००हून अधिक विशिष्ट लोकांचे एक वेगळे विश्व आहे. त्यात लोक, हस्तकला, पर्यावरण, बोलीभाषा आणि अर्थव्यवस्था यांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्हा हे स्थानिक स्वराज्य आणि दैनंदिन जीवनाची एक प्रयोगशाळा आहे. तरीही, बहुतेक नागरिकांसाठी जिल्ह्यांचा काही भाग अद्यापही अंधारातच राहिला आहे.

