
भूषण महाजन
शेअर बाजार व जनमानसाचे सेंटीमेंट बदलावे अशी आणखी एक गोष्ट म्हणजे दिल्ली विधानसभेचे निकाल! तेथेही भाजपाने बाजी मारली व दोन तृतीयांश बहुमत मिळवून सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला. आता तरी शेअर बाजाराची कळी खुलेल असे वाटत होते, पण पालथ्या घड्यावर पाणी!
गेल्या दहा दिवसात अनेक चांगल्या घटना घडून गेल्या. मागील महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांचे अधिकारग्रहण झाले व त्यांच्या आक्रस्ताळेपणावर जगातले व आपलेही बाजार डोलायला लागले. अपेक्षेप्रमाणे फेडने तेथे व्याजदर कमी केले नाहीत. त्याची तेथील बाजारने तात्पुरती प्रतिक्रिया दिली व पुढील तेजीची वाटचाल चालूच ठेवली. तेजीसुद्धा नुकताच जीम प्रवेश घेतलेल्या तरुणाने, दंडाची बेटकुळी काढून दाखवावी तशी पाच दिवसात ३५ अंशाची होती. सात फेब्रुवारीच्या शुक्रवारी डाऊ नेमका ४४१ अंशाने खाली आला आणि त्याने आठवडाभराची तेजी पुसून टाकली.