Premium|Dessert cafe business : डिझर्ट व्यवसायाला सुरुवात करताना...

Baking business : होम बेकिंगपासून दोन शाखांचं यशस्वी डिझर्ट कॅफे उभारण्यापर्यंतचा नील पाटील यांचा प्रेरणादायी उद्योजकीय प्रवास.
Dessert cafe business

Dessert cafe business

esakal

Updated on

प्रत्येक यशस्वी व्यवसायाची सुरुवात एका छोट्या कल्पनेतून होते. अर्थात कल्पनाविलासात चांगल्या वाटणाऱ्या व्यवसायाची गणितं खऱ्या आयुष्यात वेगळीच असतात. ती समजून घेण्याची आणि त्यात पारंगत होण्याची तयारी असायला हवी, मग काहीच अवघड वाटत नाही. डिझर्टच्या व्यवसायाची एक सफर...

बेकिंगमध्ये पहिलं पाऊल टाकलं, तेव्हा मी अतिशय छोट्या पातळीवर घरगुती व्यवसाय करायला सुरुवात केली. माझ्या घरातच छोटासा सेटअप करून ‘होम बेकिंग’ सुरू केलं. नवीन व्यवसाय असल्यामुळे तेव्हा खूप कमी भांडवलात काम सुरू होतं. एक छोटा ओटीजी (ओव्हन, टोस्टर, ग्रिलर), क्रीम व्हिप करण्याचं मशिन, काही नॉझल्स, एक टर्नटेबल आणि थोडंफार पॅकेजिंग मटेरिअल इतक्याच गोष्टी माझ्याकडे होत्या. पण जेव्हा जास्त ऑर्डर्स मिळू लागल्या आणि व्यवसाय वाढवण्याची वेळ आली, तेव्हा ती जागा कमी पडू लागली. एकट्यानं काम करणंही अवघड होऊ लागलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छोट्या उपकरणांच्या मर्यादा जाणवू लागल्या. तेव्हा मुख्य प्रश्‍न भांडवलाचा होता. भांडवलासाठी एमएसएमईकडून स्टार्टअप्सना मिळणारं कर्ज किंवा बँकांकडून मिळणारं बिझनेस लोन हे पर्याय उपलब्ध असतात. मी मात्र घरच्यांकडून कर्ज घेतलं आणि एक पाऊल पुढे टाकलं.

Dessert cafe business
Premium|Fitness Accessories Guide : फिटनेसला द्या फिनिशिंग टच...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com