
प्रसाद अरविंद जोग
कोकणात पर्यटन, फळप्रक्रिया, अन्नप्रक्रिया, महिला बचतगटांचे सूक्ष्म उद्योग, हस्तकला आधारित लघुउद्योग तसेच एमआयडीसीतील नवउद्योग यांमुळे औद्योगिक विकासाला गती मिळत आहे. पंतप्रधान व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनांच्या साहाय्याने गावागावात उद्योग उभे राहत असून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. विकासाला नवे वळण मिळत आहे.
कोकणातील स्वयंप्रेरित उद्योजकांची भावी पिढी उद्योजकतेकडे वळताना दिसते आहे. पर्यावरणस्नेही दृष्टिकोन जपत पर्यटन उद्योग व अन्नप्रक्रिया क्षेत्रात स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न ही नवी पिढी करत आहे.