Premium|Study Room : दारिद्र्यातला प्रकाश: धारावीतील प्रियाचे स्वप्न आणि भारताच्या विरोधाभासी वास्तवाची गोष्ट

Dharavi Girl Story : धारावीतील प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या दहा वर्षांच्या प्रियाच्या आयुष्यातील संघर्ष आणि आशावादातून जीवनातील परस्परविरोधी भावनांचा खोल अर्थ उलगडतो.
Dharavi Girl Story

Dharavi Girl Story

esakal

Updated on: 

लेखक - निखिल वांढे

धारवीच्या एका बोळात, दहा वर्षांची प्रिया एका रस्त्यावरील दिव्याखाली गणिताचा गृहपाठ पूर्ण करते. ३०० रूपये रोजंदारीवर काम करणारे तिचे वडिल स्वत:च्या औषधांचा त्याग करत मुलीला शिकवतायेत. एका छोट्याश्या खोलीत सहा जणांचं कुटुंब रहातं. पण याच्या उलट ती. वर्गात पहिली येणारी. इंजिनियर होण्याचं स्वप्न पहाणारी आणि सोयी सुविधा नसतानाही एका वेगळ्याच आनंदात जगणारी. एकीकडे तिचं आयुष्य पिळवटून टाकणारं तर दुसरीकडे प्रचंड आशावादी. पण या दोन्ही परस्परविरोधी भावना मात्र तिच्याबाबतीत खऱ्या ठरतात.

'ऑक्सिमोरॉन' म्हणजे दोन परस्परविरोधी शब्दांची एकत्र रचना; जसं की बधिर करणारी शांतता, क्रूर दयाळूपणा किंवा जिवंत मृत्यू. हे केवळ भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी असतं असं नाही, तर तो जीवनाचा एक खोल विरोधाभास असतो. अस्तित्व स्वतः अशा अनेक विसंगतींमधून आणि विरोधाभासांतूनच आकाराला येतं, हेच यातून सिद्ध होतं; कारण आयुष्याचं सगळ्यात मोठं सत्य क्वचितच सरळ, एकसमान किंवा साध्या चौकटीत बसणारं असतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com