
अतुलचंद्र कुलकर्णी
saptrang@esakal.com
पाकिस्तान अर्थात ‘आयएसआय’ आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेला लाभलेला सर्वांत तल्लख गुप्तहेर म्हणजे डेव्हिड हेडली. २६/११ हल्ल्यासाठी त्याने मुंबईतली संभाव्य ठिकाणं निवडली. या मर्यादित जबाबदारीपलीकडे जात त्याने भारताबद्दल कमालीच्या द्वेषापायी अनेक गोष्टी केल्या. हल्ल्याला वेगळे स्वरूप देण्यासाठी त्याने एक भयानक कट आखला, तो म्होरक्यांच्या गळी उतरवला. तो कट, हल्ल्याआधी व नंतर त्याने आयएसआय, लष्करसाठी भारतात केलेली कृती, डिजिटल युगात बदललेली हेरगिरीची पद्धत आणि आव्हानं याचा वेध...