

Digital Twin Technology
esakal
आपण ‘डिजिटल ट्विन्स’विषयी बरंच काही ऐकतो. हा नक्की काय प्रकार आहे? कल्पना करा की, आपल्याला ज्या गोष्टीवर किंवा प्रक्रियेवर प्रयोग करायचा आहे, त्या गोष्टीची किंवा प्रक्रियेची आपण एक ‘व्हर्च्युअल कॉपी’ केलेली आहे. आपण प्रत्यक्ष त्या गोष्टीला हातसुद्धा न लावता या कॉपीवर प्रयोग करू शकतो, डेटा पुरवून वेगवेगळ्या परिस्थितीत ती प्रतिकृती किंवा ‘व्हर्च्युअल कॉपी’ कशी वागते याचा अभ्यास करून निष्कर्षही काढू शकतो आणि त्याला ‘मॉनिटर’ही करू शकतो. यालाच ‘डिजिटल ट्विन’ असं म्हणतात. मग ती गोष्ट म्हणजे एखादी वस्तू, शेत, एखादं कार्यालय, शहर, मानवी शरीर किंवा प्रक्रियाही असू शकते.
समजा आपल्या मोटारगाडीची अशीच एक व्हर्चुअल प्रतिकृती म्हणजेच ‘डिजिटल ट्विन’ आपण बनवली आहे. आपण मोटार गाडी चालवताना ब्रेक मारल्यावर, वेग वाढवल्यावर, चढावर किंवा उतारावर जात असताना, रिव्हर्स गिअरमध्ये चालवताना, पार्क करताना आणि पुन्हा चालू करताना अशा वेगवेगळ्या अवस्थांमध्ये इंजिन, कार्बोरेटर, ऑइल टॅंक अशा वेगवेगळ्या पार्ट्समध्ये बसवलेले शेकडो सेन्सर्स आपल्या ‘डिजिटल ट्विन’ला सतत संदेश देऊन ‘अपडेट’ करत आहेत. काही काळानंतर त्या ‘डिजिटल ट्विन’ला आपल्या प्रत्यक्ष गाडीविषयी पूर्णपणे माहिती मिळालेली असेल. आता आपण कार चालवत असू त्या वेळी फक्त डिजिटल ट्विनकडे पाहून प्रत्यक्षात आपण किती वेगानं चालवतो आहोत, आपल्याला त्यातलं ऑइल केव्हा बदलायला पाहिजे, कुठला पार्ट केव्हा ब्रेकडाऊन होईल आणि त्यामुळे केव्हा त्याची देखभाल-दुरुस्ती करायला पाहिजे किंवा तो पार्ट बदलायला पाहिजे याचं भाकीतही आपण करू शकतो. ही ‘डिजिटल ट्विन’ची खरी किमया आहे. थोडक्यात म्हणजे, प्रत्यक्ष गोष्ट किंवा प्रक्रिया यांच्यापासून सेन्सर्स, इंटरनेट आणि इतर सॉफ्टवेअर टूल्स वापरून त्याबद्दलची माहिती त्याच्याच ‘डिजिटल ट्विन’ला इतकी पुरवायची की, तो डिजिटल ट्वीन ती गोष्ट किंवा प्रक्रिया याच्यासारखाच वागायला लागेल आणि त्यामुळे आपण फक्त ‘डिजिटल ट्विन’कडे बघून प्रत्यक्ष त्या गोष्टीला नियंत्रित करू शकू आणि त्याबाबतचे निर्णयही घेऊ शकू ही या मागची कल्पना आहे. याचा उपयोग अनेक कंपन्यांनी, कंपन्यांनी आणि शहरांनी करून घेतला आहे. त्याची काही उदाहरणे पाहूया -