Premium|Cyber security 2025: सायबर हल्ल्यांचे कॉर्पोरेट साम्राज्य!

Deepfake scams: सायबर गुन्हे आता संघटित उद्योग झाले आहेत. हॅकर्सच्या कंपन्यांमध्ये एचआरपासून फायनान्सपर्यंत सर्व विभाग कार्यरत आहेत
Cyber security

Cyber security

esakal

Updated on

अच्युत गोडबोले, रोहित पांढारकर

saptrang@esakal.com

हॅकर्सच्या किंवा सायबर क्रिमिनल्सच्या चक्क मोठ्या कंपन्या निघाल्या आहेत यावर आपला विश्वास बसणार नाही. त्या कंपन्यांमध्ये एचआर, रिक्रुटमेंट, संशोधन आणि विकास (आर ॲण्ड डी), टेक्निकल सपोर्ट, कस्टमर सपोर्ट, कॉल सेंटर, फायनान्स अशी डिपार्टमेंट्स असतात! तुमची कॉम्प्युटर सिस्टिम, डेटा सेंटर किंवा नेटवर्क यांच्यावर व्हायरस किंवा इतर कुठला सायबर हल्ला करून ती सिस्टिम कोडवर्ड वापरून इन्क्रिप्ट करून बंद करायची असा हा प्रकार असतो. आपण कॉम्पुटर उघडून स्क्रीन बघतो, तेव्हा त्यावर ब्लॅकमेलवजा धमकीचा संदेश झळकत असतो. तुम्ही इतके इतके डॉलर्स किंवा बरेच वेळा बिटकॉइन्स या अकाउंटवर पाठवा, तरच आम्ही तुमची सिस्टिम डिक्रिप्ट करून देऊ. त्यानंतरच तुम्हाला तुमची सिस्टिम वापरता येईल, नाहीतर तुमचा उद्योग पूर्णपणे ठप्प होईल, अशी ती धमकी असते.

तुम्ही एक व्यक्ती असल्यास ही रक्कम कमी असते आणि मोठी कॉर्पोरेशन असल्यास ती रक्कम कोट्यवधी रुपये असू शकते. यानंतर तुम्हाला चक्क त्यांच्या ‘कस्टमर सपोर्ट’कडून फोन येतो आणि पैसे कसे भरायचे, त्यानंतर सिस्टिम कशी पुन्हा चालू करायची यासाठी ‘मार्गदर्शन’ मिळतं! हे नवनवीन व्हायरसेस, वर्म्स किंवा मॅलवेअर तयार करण्याकरता त्या कंपनीमध्ये खूप हुशार तंत्रज्ञ आणि संशोधक त्यांच्या आर ॲण्ड डी आणि टेक्निकल सपोर्ट या खात्यांमध्ये काम करत असतात. कित्येक वेळा ते काम आऊटसोर्स सुद्धा करतात. उदाहरणार्थ सिस्टम बंद पडल्यानंतर पैसे वसुलीचे काम ते दुसऱ्या कंपनीवर सोपवतात आणि त्यांना २० टक्के कमिशन सुद्धा देतात. हे सगळे अतिशय पद्धतशीर पद्धतीने आज जगभर चालू आहे. (त्यांच्यामध्ये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजेच सीएसआर हेही डिपार्टमेंट असण्याची शक्यता आहे!)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com