
दिलीपकुमार दिग्दर्शकाच्या कामात ढवळाढवळ करतात, चित्रपटात आपली भूमिका वाढेल याकडे जास्त लक्ष देतात, अशी साठच्या दशकापासूनची चर्चा. या सगळ्यावर उत्तर देण्याचा एक मार्ग, स्वतःच दिग्दर्शक होणे. दिलीपकुमार यांना चित्रपट दिग्दर्शनाचा योग आला. तो चित्रपट होता ‘कलिंगा’ आणि निर्माते होते सुधाकर बोकाडे. घोषणेपासूनच गाजलेल्या ‘कलिंगा’ची गाोष्ट...
एका हिंदी वाहिनीवरील लोकप्रिय मुलाखतकाराने दिलीपकुमार यांच्या मुलाखतीसाठी सतत प्रयत्न केला. लोकप्रियतेमुळे आपणास शक्यतो कोणी नाही म्हणत नाही, असा त्या मुलाखतकाराला विश्वास होता. दिलीपकुमार मात्र पटकन हो म्हणणारी असामी नव्हती. तो मुलाखतकार साधारण दीड-दोन महिन्यांनी फोन करून आपण कधी भेटूया, असे न कंटाळता विचारत असे. दिलीपकुमार आपल्या खास शैलीत अतिशय संयमाने ‘भेटू लवकरच’ असे उत्तर देत असत.