Premium|Dinanath Mangeshkar: दिनानाथांच्या मनातील द्वंद्व, आई की मावशी?

Emotional Memoir : पंडित ह्दयनाथ मंगेशकर यांनी लिहीलेल्या स्वर्गीय दिनानाथ मंगेशकर यांच्या आठवणी. त्यातील आई आणि मावशी यांच्यातील एका वादाची आठवण
 Dinanath Mangeshkar Childhood

Dinanath Mangeshkar Childhood

E sakal

Updated on

हृदयनाथ मंगेशकर

saptrang@esakal.com

मावशी आणि आई यांच्यात दिनावरून झालेली एक अनबन आणि तिची आठवण लिहीली आहे, पंडित ह्दयनाथ मंगेशकर यांनी.

मंदिरातून मंत्रघोषाबरोबर एक प्रार्थना

पुसट ऐकू येत होती.

‘‘मागे उभा मंगेश

पुढे उभा मंगेश’’

आईने राग,अपमान, संताप, आश्चर्य यांच्या मिश्रणाने जड, लाल झालेल्या नजरेने येशुमावशीकडे पाहिले.

दुसऱ्याच क्षणी अत्यंत कर्कश आवाजात ती ओरडली.

‘‘येशु! काय म्हणालीस तू ? माझा हात खांद्यातून उखडून मला देशील ? तू मंगेशीत राहू शकशील मग ?

मला थोंग्यात्या म्हणतात.

मंगेशीचा प्रत्येक माणूस मला वचकुन असतो. माझा हात उखडणार तू ?

येशे ! या कार्ट्यासाठी तू मोठ्या बहिणीचा हात उखडणार ?’’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com