

AI video generation in Hollywood
esakal
डिस्ने आणि ओपनएआयची ऐतिहासिक युती झाल्याने आता चमत्कार होणार आहे. तुम्ही केवळ प्रेक्षक म्हणून नाही, तर मार्वेल, स्टार वॉर्स, पिक्सर किंवा डिस्नेच्या जादुई विश्वाचा एक भाग म्हणून तुमच्या आवडत्या पात्रांसोबत स्क्रीन शेअर करू शकणार आहात. थोडक्यात काय, तर कल्पनेच्या भरारीला आता तुमच्या चेहऱ्याची ओळख मिळणार आहे.
डोळे मिटून एका अविश्वसनीय दृश्याची कल्पना करा... तुम्ही ‘स्टार वॉर्स’मधील त्या प्रसिद्ध ‘मॉस एइस्ले कँटिना’मध्ये उभे आहात. तुमच्या उजव्या बाजूला साक्षात ‘आयर्न मॅन’ त्याच्या चिलखतात सज्ज होऊन उभा आहे. इतक्यात, मुलांचा लाडका ‘लाईटनिंग मॅक्विन’ आपली इंजिनं गरगरवत, धूळ उडवत तुमच्या शेजारी येऊन थांबतो. हे कमी की काय म्हणून, तुमच्या हातातल्या लखलखत्या लाईटसेबरकडे पाहून तो चिमुकला रोबो ‘आरटू-डीटू’ आनंदाने बीप-बीप करत तुमचं स्वागत करतोय.
गेल्या आठवड्यात डिस्नेने जाहीर केलेल्या तब्बल एक अब्ज डॉलर्सच्या (सुमारे आठ हजार कोटी रुपये) कराराने हे शक्य होणार आहे. आता तुम्ही केवळ प्रेक्षक म्हणून नाही, तर मार्वेल, स्टार वॉर्स, पिक्सर किंवा डिस्नेच्या जादुई विश्वाचा एक भाग म्हणून तुमच्या आवडत्या पात्रांसोबत स्क्रीन शेअर करू शकणार आहात आणि या सगळ्या जादुई दुनियेची चावी असणार आहे - ओपनएआयचं (OpenAI) बहुचर्चित ‘सोरा’ (Sora) हे अॅप.