Premium|Dividend Stability Index : लाभांश स्थैर्य निर्देशांक

Dividend sustainability index performance India 2026 : मुंबई शेअर बाजारातील ७४ कंपन्यांचा लाभांश स्थैर्य निर्देशांक दोन जानेवारी २०२६ रोजी १०७२ अंशांवर बंद झाला. सात वर्षे लाभांश कायम ठेवलेल्या कंपन्यांचा निर्देशांक दीर्घकालीन वाढ दाखवतो, सरकारी कंपन्यांचा वाटा जास्त आहे.
Dividend sustainability index performance India 2026

Dividend sustainability index performance India 2026

esakal

Updated on

प्रमोद पुराणिक- pramodpuranik5@gmail.com

आता लाभांश स्थैर्य निर्देशांक या एका वेगळ्या निर्देशांकाची ओळख करून देणार आहे. या निर्देशांकात मुंबई शेअर बाजाराने एकूण ७४ कंपन्या विचारात घेतल्या आहेत. या निर्देशांकाची सुरुवात २७ जुलै २०१५ या दिवशी १०० हा मूलभूत पाया धरून झाली. बाजारातील विविध कंपन्यांमधून ज्या कंपन्यांनी नऊ वर्षांतून किमान सात वर्षे लाभांश वाटप कायम ठेवले किंवा वाढवले, अशाच कंपन्यांचा या निर्देशांकात विचार केला जातो.

लाभांश स्थैर्य निर्देशांक दोन जानेवारी २०२६ या दिवशी १०७२ अंशांवर बंद झाला, त्याने एक दिवसात १४ अंशांनी वाढ दाखवली. यातील ७४ कंपन्यांपैकी दोन जानेवारी २६ या दिवशी एकूण ६० कंपन्यांमध्ये बाजारभावात वाढ झाली, १४ कंपन्यांच्या शेअरमध्ये घट झाली आणि फक्त एका कंपनीच्या शेअरमध्ये स्थिरता होती. या निर्देशांकाने या दिवशी ५२ आठवड्यातील उच्चांक दाखवला, तर मागील ५२ आठवड्यात सात एप्रिल २०२५ या दिवशी हा निर्देशांक ८५५ होता, याचा अर्थ २५ टक्के वाढ फक्त नऊ महिन्यांत दिसून आली. हा निर्देशांक २७ सप्टेंबर २०२४ या दिवशी सर्वाधिक म्हणजे ११४९ होता, तर सर्वांत कमी २५ मार्च २०२० या दिवशी फक्त २७३ होता, याचा अर्थ फक्त चार वर्षांत चौपट वाढ झाली. परंतु, अनेक वाचकांचे शेअर बाजारात खरेदी-विक्री करणाऱ्यांचे जास्त लक्ष ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’ यावर असते, इतर निर्देशांक उपेक्षित राहतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com