
Gold Buying Guide for Dhanteras 2025
Sakal
दिवाळी हा सण आपल्या भारतीय संस्कृतीतला एक खास आणि आनंदाचा सण आहे. या सणात आपण नव्या वस्तूंची खरेदी करतो, घर सजवतो आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे. विशेषत: धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. पण सोनं खरेदी करणं ही फक्त पारंपारिक बाब नाही, तर त्यातील आर्थिक आणि व्यावहारिक गणितही विचारात घेतलं पाहिजे. सोनं खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, याची माहिती आज आपण घेणार आहोत.