Premium|Fire Crackers and Reel: फटाक्यांसोबत जीवघेणे प्रयोग करण्याची मानसिकता कुठून येते? पालकांना मुलांना फटाके न देणं हे अपराधीपणाचं का वाटतं?

Parenting : सगळं थांबवायचं असेल तर सुरूवात कुठून करायची, मुळात याचं गांभीर्य मुलांना कसं सांगायचं, मुलांना पर्यायी गोष्टी काय द्यायच्या असं सगळं या विशेष लेखाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया..
fire cracker diwali

fire cracker diwali

Esakal

Updated on: 

पुणे – प्रदूषणाचं कारण बरोबर आहे पण बाकी सगळी मुलं आजूबाजूला फटाके उडवतायेत आणि आपण असं मुलांना फटाके न देऊन त्यांना सणाच्या दिवशी कसं घरात बसून रहा म्हणायचं? पालक म्हणून तुम्हालाही मुलांना फटाक्याला नाही म्हणणं जरा अवघड वाटतं, अपराधी वाटतं ना.? आपण थोडेसेच घेऊच्या नादात झाड, भुईचक्र, फुलबाजी, थोडेसे वाजणारे असे फटाके घेतो. मुलांना त्यात मजा यायला लागते, मग मुलांना काहीतरी थ्रील करावसं वाटतं, फटाके वाजवायचेच असतात हे त्यांच्या मनात रूजतं आणि फटाक्यांची सवय लागून जाते.

हल्ली तर हा प्रकार फक्त फटाके वाजवण्यापुरता मर्यादित राहिला नाही तर फटाक्यांसोबत जीवघेणे प्रयोग करून रील करण्यची मानसिकता निर्माण झाली आहे. फटाका पेटवून त्यावर ग्लास किंवा वस्तू ठेवणं, फटाक्याचे बाण नेम धरून कोणाच्यातरी घरात सोडणं, कोणाच्यातरी नकळत त्यांच्या मागे फटाका लावून पळ काढणं अशा व्हिडिओजना मिलियनमध्ये व्हूज आहेत, लाखोंमध्ये हे रील शेअर केले जात आहेत. यातून घडणाऱ्या गंभीर आगीच्या घटना, जीव धोक्यात येणं, आजूबाजूचा परिसर धोक्यात येणं या घटनांची आकडेवारी मागीलवर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट होत चालली आहे. गेल्या तीन दिवसांमधली जरी आकडेवारी काढली तरी याचं गांभीर्य लक्षात येईल.

पण या सगळ्याचं गांभीर्य आपल्याला कसं आणि कधी लक्षात येईल, हे सगळं थांबवायचं असेल तर सुरूवात कुठून करायची, मुळात याचं गांभीर्य मुलांना कसं सांगायचं, मुलांना पर्यायी गोष्टी काय द्यायच्या असं सगळं या विशेष लेखाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया..

Loading content, please wait...