

Diwali Muhurat Trading and Stock Market Investment
esakal
सिद्धार्थ खेमका
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लि.
‘दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर आवर्जून सोने किंवा नवी खरेदी केली जाते. शेअर बाजारातही ‘मुहूर्त ट्रेडिंग’चे विशेष सत्र आयोजित केले जाते. दिवाळीच्या कालावधीत शेअर बाजारात गुंतवणूक करून चांगला लाभ मिळावा, अशी अपेक्षा गुंतवणूकदारांची असते. छोट्या गुंतवणूकदारांना या कालावधीत शेअर खरेदीसाठी मदत करता यावी, यासाठी सर्वोत्तम शेअरची शिफारस केली आहे.
संवर्धन मदरसन (उद्दिष्ट : रु. १८७)
भक्कम ऑर्डर बुक, आर्थिक वर्ष २०२७ मध्ये दहा नवे उत्पादन प्रकल्प सुरू करण्याची योजना आणि वाहन उद्योग; तसेच ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील सातत्यपूर्ण गुंतवणूक यांमुळे कंपनीच्या वाढीच्या शक्यता मजबूत आहेत. प्रीमियम उत्पादनांकडे वाढता कल आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे (ईव्ही) होणारे संक्रमण यामुळे मागणीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. नेक्सान्स ऑटोइलेक्ट्रिक व युताका गिकेन या कंपन्यांचे अधिग्रहण; तसेच शेनझेन ऑटोक्रूझच्या नियोजित अधिग्रहणामुळे कंपनीची जागतिक उपस्थिती आणि उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत होईल. आर्थिक वर्ष २०२६ ते २०२८ या कालावधीत कंपनीच्या ‘ईबीआयटीडीए’मध्ये २२ टक्के , तर नफ्यात ३९ टक्के वार्षिक चक्रवाढ दराने(सीएजीआर) वाढ होईल.