
श्रीराम पवार
shriram1.pawar@gmail.com
अमेरिकेत मोदी यांच्यासाठी आयोजित केलेला ‘हाउडी मोदी’ हा झगमगाटी इव्हेंट आणि पाठोपाठ भारतात झालेला ‘नमस्ते ट्रम्प’ हा त्याची जणू परतफेड करण्यासाठी तितकाच रंगारंग इव्हेंट यातून भारत आणि अमेरिका किती जवळ येताहेत याचं प्रदर्शन केलं जात होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील व्यक्तिगत संबंध, केमिस्ट्री नव्या जागतिक रचनेवर प्रभाव टाकणारी ठरेल, अशी भाकितं जोरात होती. मोदी यांनी ट्रम्प यांची ओळख ‘माझे मित्र, भारताचे मित्र आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष’ अशी टाळ्यांच्या कडकडाट करून दिली होती.