Reading good for mental health
Esakal
पुणे – या एका पुस्तकाने माझं आयुष्य बदललं.. या एका पुस्तकाने मला जगण्याचा एक वेगळा दृष्टीकोन दिला... या एका पुस्तकाने माझं आयुष्य समृद्ध केलं.. असं म्हणणारी माणसं तुमच्या माझ्या अवती भवती असतात. पण असं एखाद्याचं आयुष्य बदलावं एवढा बदल ही पुस्तकं घडवून आणतात का?
मानसशास्त्रात वाचनाला केवळ एक छंद मानले जात नाही, तर त्याला 'मानसिक व्यायाम म्हणजेच Cognitive Workout म्हटले जाते. वाचन ही केवळ एक बौद्धिक क्रिया नाही, तर ती मेंदूच्या पातळीवर चालणारी एक जिवंत रासायनिक आणि जैविक प्रक्रिया आहे. जेव्हा आपण पुस्तक उघडतो आणि वाचू लागतो, तेव्हा मेंदूमध्ये हार्मोन्स, न्यूरोट्रांसमीटर्स आणि इलेक्ट्रिकल सिग्नल्सचे एक प्रचंड मोठे जाळे सक्रिय होते. पण हे सगळं कसं घडतं आणि खरंच त्याने आयुष्य बदलण्याइतक्या मोठ्या गोष्टी घडतात का? आणि जर घडत असतील तर मेंदूत नेमकं असं काय घडतं, मानसशास्त्र याविषयी काय सांगतं हे सगळं आपण आजच्या या सकाळ+ च्या विशेष लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया..