
हर्ष काबरा
editor@esakal.com
डोनाल्ड ट्रम्प यांची भारतातील प्रतिमा झपाट्याने विरली आहे. एकेकाळी भारताबद्दल स्तुतिसुमने उधळणारे ट्रम्प, आता तेल, व्यापार आणि वर्चस्वावरून भारताशी आडवळणावर येऊ लागले आहेत. ८ जुलैपर्यंत भारत-अमेरिका व्यापार कराराबाबतची स्थिती आशादायक होती.
पण ३१ जुलैला ट्रम्पने भारतीय वस्तूंवर २५ टक्के आयातशुल्क जाहीर केले आणि प्रेमकथेचे थेट एका थरारक शोकांतिकेत रूपांतर झाले. बुधवारी ट्रम्प यांनी भारत रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी सुरूच ठेवत असल्याचे आणि त्या तेलाचा मोठा भाग आंतरराष्ट्रीय बाजारात चढ्या किमतीत विकत असल्याचे कारण सांगून भारतीय वस्तूंवर आयातशुल्क दुप्पट करून ५० टक्के केले.