
Trump Nobel Peace Prize
esakal
डोनाल्ड ट्रम्प नोबेल पारितोषिक जिंकणारे अमेरिकेचे अध्यक्ष होणार का? यंदाचे शांततेचे नोबेल जिंकावे, अशी ट्रम्प यांची इच्छा आहे. अंदाजे दहा वर्षांपासून त्यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे वादविवाद निर्माण झाले आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षासह सात संघर्ष थांबविण्यात पुढाकार केल्याचा त्यांचा दावा आहे. या पारितोषिकास मी पात्र आहे, असे त्यांना वाटत आहे. मात्र, भारत-पाकिस्तान संघर्ष संपविण्यात ट्रम्प यांनी कोणतीही भूमिका बजावली नाही, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
जानेवारीत व्हाइट हाउसमध्ये अध्यक्षपदावर परतल्यापासून ट्रम्प यांनी ‘हा प्रतिष्ठित सन्मान मला हवा आहे,’ असे वारंवार स्पष्ट केले आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे बराक ओबामा यांनी २००९ मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना लगेचच नोबेल पारितोषिक मिळाले होते. त्यांना हा सन्मान मिळवल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. गाझा आणि युक्रेनमधील युद्ध संपविण्याची ट्रम्प यांची इच्छा आहे. अद्यापही हे युद्ध सुरूच आहे. अनेक युद्ध संपल्याचा दावा ७९ वर्षीय ट्रम्प यांनी केला आहे. प्रत्येक संधीचा फायदा घेऊन ते यासाठी पात्र असल्याचे ते वारंवार म्हणत आहेत.