
डॉ.अशोक कुडले
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कारकिर्दीत डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक निर्णय घेतले, त्याचा परिणाम अनेक देशांवर झाला. कोणतीही व्यापक असे अधिष्ठान नसलेली तात्पुरता फायदा पाहून आखलेल्या धोरणांमुळे जगातील प्रश्न बिकट झाले आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात एकाहून एक धक्कादायक घडामोडींनी झाली. निवडणूक प्रचारादरम्यान ‘रशिया-युक्रेन युद्ध २४ तासात थांबवेन’ असे वारंवार सांगणाऱ्या ट्रम्प यांनी सूत्रे हाती येताच युद्धबंदी व शांतता स्थापित करण्याच्या दिशेने प्रयत्न केले.