Premium|dr babasaheb ambedkar jayanti : लोकशाहीतील कर्तव्यांबाबत बाबासाहेब काय म्हणाले होते?

Dr Babasaheb Ambedkar speech : स्वातंत्र्य मिळालं म्हणजे सगळं काही झालं नव्हे तर आता खरी जबाबदारी आहे, अशा अर्थाचं डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं हे भाषण वाचणं महत्त्वाचं आहे.
Ambedkar on Democracy: The Real Preconditions India Must Remember

Ambedkar on Democracy: The Real Preconditions India Must Remember

E sakal

Updated on

Why Democracy Needs Equality, Opposition & Morality: Ambedkar Explained

पुण्यात ‘पूना डिस्ट्रिक्ट लॉ लायब्ररी’ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २२ डिसेंबर १९५२ रोजी केलेल्या भाषणाचा हा संपादित अंश. लोकशाही राज्यपद्धती व्यवहारात अर्थपूर्ण व्हावी, यासाठी ज्या पूर्ववर्ती शर्तींचा ऊहापोह बाबासाहेबांनी त्यांच्या विवेचनादरम्यान केला, त्याची प्रस्तुतता या घडीला प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळेच हे विवेचन त्यांच्या जयंतीदिनी आवर्जून प्रसिद्ध करीत आहोत.

कोणत्याही प्रकारचा अडथळा नसताना लोकशाही शासनव्यवस्था कार्यरत व्हावी यासाठी ज्यांचे अस्तित्व आवश्यक आहे अशा पूर्ववर्ती शर्ती कोणत्या आहेत?

याच विषयावर काही विचार मांडण्याचा माझा मानस आहे. माझ्या मताप्रमाणे लोकशाहीच्या यशस्वी कामकाजाची पहिली शर्त म्हणजे समाजामध्ये भयानक विषमता असता कामा नये, पिळलेला वर्ग असता कामा नये, दडपलेला वर्ग असता कामा नये. ज्याला सर्व विशेषाधिकार आहेत, असा आणि जो केवळ ओझ्याचा बैल आहे, असा वर्ग, अशी स्थिती समाजात असता कामा नये.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com