Life lessons from Dr APJ Abdul Kalam
esakal
Premium|Study Room : तुम्ही काय निवड करता यावरून तुमचे प्रारब्ध ठरते..!
लेखक - निखिल वांधे
साल होते १९५०. तामिळनाडूच्या रामेश्वरम या चिमुकल्या बेटावर 'अवुल पाकीर जैनुलाबदीन अब्दुल कलाम' नावाचा एक मुलगा पहाटे ४ वाजताच उठला. बोटी भाड्याने देणाऱ्या एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या या मुलाचे भविष्य कदाचित गरिबी आणि मर्यादित संधींच्या चौकटीतच अडकलेले असावे, असे कोणालाही वाटले असते. परंतु, अथक परिश्रमांच्या आणि जिद्दीच्या निवडीतून आर्थिक चणचण असूनही शिक्षणाची धरलेली कास, वैमानिक अभियांत्रिकीचे ध्येय गाठण्याचा निश्चय आणि अपयशातही न डगमगता दिलेली झुंज हाच मुलगा पुढे भारताचा 'मिसाईल मॅन' आणि ११ वा राष्ट्रपती बनला. डॉ. कलामांचे जीवन विल्यम जेनिंग्ज ब्रायन यांच्या त्या महान सत्याचा पुरावा आहे. ‘प्रारब्ध हा केवळ नशिबाचा खेळ नसून ती आपल्या निवडीची फलश्रुती आहे.’ हे विधान त्या नशिबवादी विचारसरणीला आव्हान देते जी जन्माला, दैवाला किंवा नशिबालाच जीवनाचे शिल्पकार मानते. हा निबंध मानवी इच्छाशक्ती, सामाजिक रचना आणि दैव व प्रयत्नवाद यांच्यातील संघर्षातून मानवी भविष्य कसे घडते, याचा वेध घेतो.

