
डॉ. जी. जी. पारीख
esakal
mmrmohite@yahoo.com
ज्येष्ठ गांधीवादी नेते आणि स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतलेले समाजवादी विचारांचे नेते जी. जी. पारीख यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ एका ज्येष्ठ गांधीवाद्याचा नाही; तर एका विचाराचा आणि समर्पणाच्या प्रवासाचा अंत झाला आहे. ३६,७७५ सूर्य पाहिलेले जी. जी. किमयागार आहेत, हे मनावर कोरले गेले आहे, ज्याचे कधीच विस्मरण होऊ शकत नाही...
महात्मा गांधीजींना प्रत्यक्ष भेटण्याची संधी डॉ. जी. जी. पारीख यांना मिळाली तेव्हा त्यांचे वय अवघे आठ वर्षांचे होते. महात्माजींचे व्यक्तिमत्त्व, त्यांच्या कार्यक्रमाच्या बातम्या आणि जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, डॉ. राम मनोहर लोहिया, युसूफ मेहेरअलींसारखे मातब्बर यांच्या कार्यक्रमात सहभागी होऊन जनसामान्यांमध्ये काम करणारे, स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करणारे व प्रसंगी तुरुंगवास भोगणारे नेते पाहतच डॉ. पारीख गांधी विचारांनी भारले गेले होते. वयाची एकशेएक वर्षे पूर्ण करीत असताना त्यांना गांधीजींच्या जयंतीला मृत्यू यावा, हा एक योगायोग होता... आमच्यासाठी वेदना!