Premium|Milind Shinde life journey : मलबार हिलच्या बंगल्यात राहून 'स्ट्रगल'? डॉ. मिलिंद शिंदे यांनी सांगितली त्या आलिशान परिसरातील एका छोट्या अंधाऱ्या खोलीची रंजक गोष्ट!

Marathi Actor Struggle Journey : अभिनेता डॉ. मिलिंद शिंदे यांच्या संघर्षाच्या काळात मलबार हिलमधील त्या 'आउटहाउस'ने दिलेला आसरा आणि 'नॉट ओन्ली मिसेस राऊत' चित्रपटाने दिलेले आर्थिक बळ, यातून उलगडणारा एका कलावंताचा अंतर्मुख करणारा भावूक प्रवास.
Milind Shinde life journey

Milind Shinde life journey

esakal

Updated on

डॉ. मिलिंद शिंदे - saptrang@esakal.com

मग वाटायचं किती दिवस हे सगळं पुरणार आहे? हे सगळं स्वत:हून बाळगण्याचं बळ आपल्यात येणार आहे की नाही? किती दिवस हे पॅरासाइट जगणं आपण कवटाळून बसणार आहोत? हे सगळं स्वत:हून झुगारता यायला हवं... हा कम्फर्ट भिरकावून देता यायला हवा.

‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’ या सिनेमानं पुरस्कार आणलेच, पण थोडं आर्थिक बळही दिले.

मलबार हिल...?

मलबार हिल रहते हो तुम?

मी ‘हो’ म्हणालो. राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या ‘साँग’ नावाच्या विद्यार्थी संघटनेच्या एका छोटेखानी मीटिंगमध्ये घडलेला हा संवाद.

तुम मलबार हिल रहके स्ट्रगल करते हो?

लोक स्ट्रगल करके मलबार हिल पहुँचते है... तुम तो सेटल हो गये हो एक हिसाब से...

बाळासाहेब थोरात तेव्हा पाटबंधारे मंत्री होते. तेव्हा त्यांच्या ‘लॅंड्‌स एंड’ या बंगल्यातल्या कोपऱ्यातल्या आउटहाउसमध्ये माझी राहायची सोय झाली (केली) होती. त्यामुळे माझा राहण्याचा पत्ता ‘साँग’च्या डायरीमध्ये ‘मलबार हिल लँड्‌स एंड’ असा होता.

राजीव राजळे आता हयात नाहीत, एक टर्म आमदार होते ते. त्यांच्या भावाच्या (राहुल) आणि राजीव राजळे यांच्यामुळे त्यांच्या मामाच्या लँड्‌स एंडमध्ये मला जमीन मिळाली. राजीव राजळे यांना मी माझी राहण्याविषयी अडचण सांगितली... त्यांनी ती सोडवली. कधी कधी ते माझ्या त्या आउटहाउसमधल्या छोट्याशा अंधाऱ्या खोलीत येत. माझ्या मळकट बेडशीटवर बसत... बोलता बोलता त्या बेडशीटवरीची नक्षी, पॅटर्न, कलर्स यावर बोलत... मग सिंध संस्कृती, इजिप्तशियन रेव्होल्यूशन हेराकोट्टा यावर ते विस्तृत चर्चा करत. (पेशानं आर्टिस्ट होते ते.)

सिनेमा, नाटक, ओशो पुस्तके यांवर सखोल विवेचन करीत. सुलगचा प्रयोग नगरला लागला होता. मी त्यांना आमंत्रित केलं, तेव्हा ते थोडाच वेळ थांबेन असं म्हणाले... पण अडीच तास त्यांनी ते नाटक पाहिलं. पण जगण्याचा खेळ लवकर सोडून गेले. जेव्हा जेव्हा कुणी हडप्पा, मोहंजोदडोचा विषय काढतो... तेव्हा त्यावर साधकबाधक चर्चा करणारे राजीव राजळे आठवतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com