Premium|Political Economy Maharashtra : शहरी भागातील वितरणाचे राजकीय अर्थकारण

Relationship between Politics and Economics : उत्पादन, वितरण आणि नियंत्रणाच्या प्रक्रियेत राजकीय अभिजन (आमदार, नगरसेवक) कसे निर्णय घेतात आणि झोपडपट्टी पुनर्वसन सारख्या योजनांतून आर्थिक प्रक्रियेवर राजकारण कसे परिणाम करते, याचे सखोल विश्लेषण त्यांनी मांडले आहे.
Relationship between Politics and Economics

Relationship between Politics and Economics

esakal

Updated on

प्रा. डॉ. प्रकाश पवार राज्यशास्त्र अधिविभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर

उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग या चार घटकांच्या संदर्भातील प्रक्रियांना जगभर सर्वत्र राजकीय अर्थकारण म्हणून ओळखले जाते. या चार घटकांच्या संदर्भात राजकीय अर्थकारणाचा वेगवेगळा अर्थ काळानुसार स्पष्ट होत गेला. तसेच ग्रामीण आणि शहरी भागात अर्थ स्पष्ट होत गेला. संपत्तीची निर्मिती हा सुरुवातीचा राजकीय अर्थकारणाचा अर्थ होता. यामुळे राष्ट्राने संपत्ती निर्माण करणारी संसाधने एकत्रित करण्याची किंवा गोळा करण्याची प्रक्रिया महत्त्वाची ठरली. हा अर्थ ॲडम स्मिथ यांनी विकसित केला होता. ॲडम स्मिथ आणि डेव्हिड रिकार्डो यांच्यापेक्षा वेगळा अर्थ राजकीय अर्थकारणाचा कार्ल मार्क्स आणि फेडरिक एंजल्स यांनी स्पष्ट केला. उत्पादन साधनांची मालकी कोणत्या वर्गाकडे आहे. ती मालकी राजकीय प्रक्रिया कशी घडवते. मालक वर्ग नियंत्रण निर्माण करण्यासाठी उत्पादनाच्या साधनांचा वापर करतात. या प्रक्रियेला स्थूल मानाने राजकीय अर्थकारण कार्ल मार्क्सने म्हटले होते. या अर्थकारणाच्या दृष्टिकोनामुळे आर्थिक दृष्टिकोन आणि समाजशास्त्रीय दृष्टिकोन असे दोन राजकीय अर्थकारणाचे भाग तयार होतात. उत्पादनाची साधने हा एक भाग आहे. उत्पादन हा त्याचाच महत्त्वाचा भाग आहे. परंतु मालक वर्ग आणि मजूर किंवा कामगार वर्ग असे समाजशास्त्रीय विश्लेषण केले जाते. यामुळे राजकीय अर्थकारणाचे विश्लेषण समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून केले जाते. त्याबरोबरच तिसरा ही दृष्टिकोन तयार होतो, तो म्हणजे प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे. आर्थिक प्रक्रियेच्या संदर्भातील निर्णय घेणे या घटकांना महत्त्व प्राप्त होते. नियंत्रण ठेवणारा वर्ग अभिजन वर्ग म्हणून उदयाला येतो. अभिजन वर्ग हा राज्यकर्ता वर्ग असतो. थोडक्यात राजकारण अर्थकारणावर परिणाम करते. या प्रक्रियेचा एक राजकीय दृष्टिकोन तयार होतो. महाराष्ट्रातील २९ महापालिकांमध्ये निवडून आलेले नगरसेवक राजकीय अभिजन म्हणून आर्थिक प्रक्रियेच्या संदर्भातील निर्णय घेतात. जिल्हा परिषदांमध्ये निवडून आलेले सदस्य राजकीय अभिजन म्हणून जिल्ह्याच्या आर्थिक प्रक्रियेच्या संदर्भातील निर्णय घेतात. महाराष्ट्राच्या विधानसभेवर निवडून आलेले २८८ आमदार राजकीय अभिजन म्हणून आर्थिक प्रक्रियेच्या संदर्भातील निर्णय घेतात. निर्णय घेण्याचा अधिकार हा आर्थिक अधिकारही आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com