

Misleading ORS Drinks
esakal
अतिसार झाल्यावर लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या ओआरएसमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असल्याने ते आरोग्यासाठी अपायकारक असल्याचे लक्षात आले. तो धोका लक्षात घेत बाजारात सर्रास उपलब्ध असलेल्या ओआरएसविरुद्ध डॉ. शिवरंजनी संतोष यांनी लढा सुरू केला. त्यात त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले; परंतु आठ वर्षांच्या लढ्यानंतर यश आले. अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने कोणत्याही पेयावर ओआरएस लिहिण्यास त्यानंतर बंदी घातली.