
Drone Warfare in Deep Underwater जमिनीवर युद्ध झालं, हवाई हल्ल्यांचं युद्ध झालं, समुद्रावरील लढाई पण झाली आणि त्यानंतर ड्रोन युगाने हवाई हल्ल्यांना वेगळंच बळ मिळालं आहे. आता AI च्या युगात आणखी एक क्रांती घडताना दिसत आहे. एरवी हवेत घिरट्या घालणारे Drones आता समुद्राच्या तळाशी जाऊन युद्ध करण्यासाठी सज्ज राहणार आहेत. ड्रोन हे पाण्याखालीही युद्धासाठी मदत करू शकतील असा दावा अमेरिकेतील काही संरक्षण कंपन्या आणि नौदल करत आहेत.