

IMD Drought Criteria and Scientific Definition
esakal
दुष्काळ म्हटला की डोळ्यांसमोर येते ती कोरडी जमीन, पाण्यासाठी भटकंती आणि पिकांकडे लागलेले शेतकऱ्यांचे डोळे. मात्र दुष्काळ हा केवळ तात्पुरत्या पावसाचा प्रश्न नाही. त्याचा थेट परिणाम शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था, रोजगार, पशुधन, शिक्षण आणि पिण्याच्या पाण्यावर होतो. यंदा महाराष्ट्रातील ३५८ पैकी २६५ तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाल्याने या संकटाची व्याप्ती लक्षात येते. पण दुष्काळ जाहीर करण्याचे निकष नेमके काय आहेत? ट्रिगर-१ म्हणजे काय? पिकांचे नुकसान कसे मोजले जाणार? सरकारने कोणत्या सवलती जाहीर केल्या आहेत? आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी पाणीसंधारणाची भूमिका काय आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे समजून घेतल्याशिवाय महाराष्ट्रातील दुष्काळाचे चित्र पूर्णपणे समजणार नाही.