

Types of Drought
esakal
लेखक : सागर रेपाळे
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मते, एखाद्या प्रदेशातील हंगामी पर्जन्यमान दीर्घकालीन सरासरीच्या ७५% पेक्षा कमी झाल्यास हवामानशास्त्रीय दुष्काळ (Meteorological Drought) घोषित केला जातो. पर्जन्यमानातील तूट २५ ते ५०% असल्यास मध्यम दुष्काळ, तर ५०% पेक्षा अधिक असल्यास तीव्र दुष्काळ मानला जातो. दुष्काळाचा शेती, जलस्रोत, अर्थव्यवस्था आणि समाजावर गंभीर परिणाम होतो.
दुष्काळाचे प्रमुख चार प्रकार आहेत.
अ) हवामानशास्त्रीय दुष्काळ : पर्जन्यमान सामान्यपेक्षा २५% किंवा त्याहून अधिक कमी झाल्यास निर्माण होतो.
ब) कृषी दुष्काळ : मातीतील आर्द्रता पिकांच्या गरजेनुसार अपुरी पडल्यामुळे उद्भवतो.
क) जलवैज्ञानिक दुष्काळ : दीर्घकाळ कमी पर्जन्यमान झाल्यामुळे नद्या, जलाशय आणि भूजलाची पातळी घटते.
ड) सामाजिक-आर्थिक दुष्काळ : पाणीटंचाईमुळे रोजगार, उत्पन्न, अन्नपुरवठा आणि उपजीविकेवर परिणाम होऊ लागल्यास उद्भवतो.