Premium|Parliament budget session 2026 controversy : संसदीय लोकशाहीसाठी धोक्याची घंटा

General Naravane book impact on India Parliament session : संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात गंभीर गोंधळ उडाला. जनरल नरवणे यांच्या पुस्तकावर चर्चा आणि पंतप्रधानांचे भाषण न होण्यामुळे संसदीय लोकशाहीला धोका निर्माण झाला. सुरक्षा आणि संसदेत गोंधळाचे गंभीर परिणाम.
Parliament budget session 2026 controversy

Parliament budget session 2026 controversy

esakal

Updated on

सुनील चावके - ‘सकाळ’च्या दिल्ली ब्यूरोचे प्रमुख

संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनातील गेल्या आठवड्यातील घडामोडी अकल्पित, ऐतिहासिक आणि वेगवान ठरल्या. जनतेने निवडून दिलेल्या सभागृहात कल्पनाही करता येणार नाही असे अराजक माजू शकते, असा इशारा खुद्द लोकसभा अध्यक्षांनीच देणे ही बाब गंभीर आहे. संसदीय लोकशाहीसाठी ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल.

अनिश्चित जागतिक आर्थिक आव्हानांना सामोरे जाताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर लोकसभेच्या कामकाजालाही अनिश्चिततेचे ग्रहण लागले. माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या ‘अप्रकाशित’ पुस्तकातील उतारे वाचून दाखवण्यास लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना मज्जाव करण्यात आल्यानंतर लोकसभेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्ताव चर्चेला नाट्यमय कलाटणी मिळाली. परिणामी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही लोकसभेत भाषण करता आले नाही आणि संसदीय लोकशाहीची वाटचाल धूसर झाल्याचे चित्र निर्माण झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com