
AI in primary education
esakal
पहिलीपासून तिसरी भाषा शिकवण्याबाबतचा निर्णय मागे पडल्यावर आता तिसरीपासून कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश करण्यात येणार आहे. वास्तविक बालकाचा विकास होताना जिज्ञासा, चिकित्सक वृत्ती, कृतीतून शिक्षण इत्यादी गोष्टींची खरी गरज आहे. त्याऐवजी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शिकवल्यास अशी कौशल्ये विकसितच होणार नाहीत. बालक कायमच भावनांशी निगडित नसलेल्या विचारांचा गुलाम बनेल.
२०२६-२७ पासून देशभरातील शाळांमध्ये तिसरीपासून कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश करण्यात येणार आहे. त्यासाठी नवा अभ्यासक्रमही तयार केला जात आहे, अशी बातमी काही दिवसांपूर्वीच आली आणि काही प्रश्न निर्माण झाले. मुळात पहिलीपासून तिसरी भाषा आणि तिसरीपासून कुत्रिम बुद्धिमत्तेचे धडे मुलांना देण्याची गरज आहे का, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. नक्कीच नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे; पण ते एवढ्या लवकरच सुरू करणे कितपत सयुक्तिक ठरेल?