Premium|Study Room : पृथ्वीचे चुंबकीय कवच आणि अवकाश संशोधनातील नवी झेप!

How Magnetosphere Protects Earth : पृथ्वीभोवती असलेले मॅग्नेटोस्फियर हे सौरवारे, वैश्विक किरणे आणि घातक विकिरणांपासून संरक्षण करणारे नैसर्गिक कवच असून पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
How Magnetosphere Protects Earth

How Magnetosphere Protects Earth

esakal

Updated on

लेखक : सागर रेपाळे

पृथ्वीभोवती असलेल्या विशाल, थेंबाच्या आकाराच्या अवकाश प्रदेशाला मॅग्नेटोस्फियर असे म्हणतात. हा प्रदेश पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राद्वारे नियंत्रित होतो. पृथ्वीच्या बाह्य गाभ्यातील वितळलेल्या लोह व निकेलच्या संवहन प्रवाहांमुळे हे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. या प्रक्रियेला जिओडायनॅमो प्रक्रिया असे म्हणतात. सौरवारे आणि वैश्विक किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण करणे हे या मॅग्नेटोस्फियरचे प्रमुख कार्य आहे.

सौर किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण करणारे कवच

मॅग्नेटोस्फियर हे पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी एक अत्यंत महत्त्वाचे संरक्षक कवच आहे. सूर्यापासून येणाऱ्या चार्ज कणांना म्हणजेच प्रोटॉन्स व इलेक्ट्रॉन्सना हे क्षेत्र परावर्तित करते. त्यामुळे या कणांना पृथ्वीचे वातावरण आणि ओझोन थर नष्ट करता येत नाही. जर मॅग्नेटोस्फियर नसते, तर पृथ्वीवर जीवसृष्टी शक्य झाली नसती, कारण घातक अतिनील व वैश्विक किरणे थेट पृथ्वीच्या पृष्ठभागावर आदळली असती.

मॅग्नेटोस्फियरची रचना व घटक

मॅग्नेटोस्फियरमध्ये अनेक महत्त्वाचे स्तर व घटक असतात. बो शॉक हा सर्वांत बाहेरचा स्तर असून येथे सूर्यापासून येणारे अतितीव्र सौरवारे अचानक मंद होतात. बो शॉक व मॅग्नेटोपॉजच्या मधल्या अस्थिर भागाला मॅग्नेटोशीथ म्हणतात. मॅग्नेटोपॉज ही ती तीव्र सीमारेषा आहे, जिथे सौरवाऱ्यांचा दाब आणि पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा दाब एकमेकांना संतुलित करतात. रात्रीच्या बाजूला सौरवाऱ्यांमुळे मॅग्नेटोस्फियर हजारो पृथ्वी-त्रिज्यांइतका ताणला जातो. या भागाला मॅग्नेटोटेल असे म्हणतात.

याशिवाय व्हॅन अॅलन रेडिएशन बेल्ट्स हे दोन महत्त्वाचे क्षेत्र असून येथे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राने अडकवलेले उच्चऊर्जा कण असतात. आतील मॅग्नेटोस्फियरमध्ये प्लाझ्मास्फियर नावाचा थंड व घनदाट प्लाझ्माचा प्रदेश असतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com