
ज्योती हांडगे
ऑफिस, कॉलेज, पार्टी अशा विविध ठिकाणी विविध प्रकारची ज्वेलरी परिधान केली जाते. टेराकोटा, ज्यूट, अॅक्रॅलिक, रेझिन अशा विविध मटेरिअल्सपासून तयार होणारे दागिने सध्या ट्रेंडमध्ये आहेत.
फॅशन ही केवळ कपड्यांपुरती मर्यादित नसते. तुमचा संपूर्ण लुक महत्त्वाचा असतो. आणि ज्वेलरी हा त्यातील महत्त्वाचा घटक आहे. ज्वेलरीमुळे लुक अधिक खुलतो. ज्वेलरीचे प्रकार अनेक. पारंपरिक सोन्या-चांदीचे दागिने रोज वापरले जात नाहीत. या दागिन्यांना हलक्या, पर्यावरणपूरक तसेच ट्रेंडी दागिन्यांचे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. टेराकोटा, ज्यूट, अॅक्रॅलिक, रेझिन अशा विविध मटेरिअल्सपासून तयार होणारे दागिने सध्या ट्रेंडमध्ये आहेत.