
डॉ. शरदिनी रथ
प्राथमिक पदवीचे उत्पन्नाच्या दृष्टीने महत्त्व काय, या प्रश्नाचे सकारात्मक उत्तर एका अभ्यासातून समोर आले आहे. त्यातील निष्कर्षांनुसार पदवीधारकांना सार्वजनिक व खासगी क्षेत्रांत नोकऱ्या तर मिळाल्याच, पण १० वर्षांच्या कालखंडात त्यांची मिळकत चलनवाढीच्या तुलनेत चांगली राहिली. ज्यांनी स्वत:चा व्यवसाय केला वा पदव्युत्तर पदवी घेतली, त्यांच्यासाठी ही वाढ आणखी जास्त होती.
नो करदार वयोगटातील अधिकाधिक व्यक्तींना औपचारिक क्षेत्रात जास्त पगाराचे रोजगार मिळावेत, हे धोरणाचे सर्वांत महत्त्वाचे उद्दिष्ट असायला हवे. शिक्षण, गुंतवणूक आणि न्याय्य वाटप या तिन्ही अंगांनी ते गरजेचे आहे. पदवीचे शिक्षण खरेच महत्त्वाचे आहे का? पदवी नाही घेतली, तर काय होईल? या चर्चेमध्ये काही पाहण्यांचे निष्कर्ष चित्र स्पष्ट करतात.