
Indian politics economic issues
esakal
संजय कुमार
आर्थिक मुद्दे आणि परराष्ट्र संबंध देशातील मतदारांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आल्याचे चित्र आहे. भारतीय राजकारण वर्षानुवर्षे जात, समुदाय, कौटुंबिक कलह आणि संबंधित मुद्द्यांभोवतीच फिरत होते. मात्र, आता ती स्थिती नाही. जीएसटी सुधारणा, पंतप्रधानांचे विदेश दौरे आणि त्यांचे फलित यांची चर्चा देशातील सर्वसामान्य मतदारही करत आहेत.
भारतीय राजकारणामध्ये वर्षानुवर्षे जात आणि समुदाय, कौटुंबिक कलह, नेतृत्व आणि संबंधित मुद्द्यांवरच चर्चा होत आली आहे. मात्र, अलीकडच्या काही वर्षांमध्ये भारतीय राजकारणात अगदी सामान्य मतदारही आर्थिक मुद्दे आणि परराष्ट्र संबंध चर्चेच्या आघाडीवर आल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर लादलेले अतिरिक्त आयातशुल्क आणि त्यानंतर सुधारित जीएसटी दरांचा मुद्दा सामान्य लोकांमध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.