
शिक्षण हे ज्ञानाची कवाडे उघडणारे, मुक्त विचारांना वाव देणारे, स्वक्षमता फुलवणारे व मानवी मूल्ये रुजवणारे हवे. ते दांडग्या धनिकांच्या, लहरी सरकारच्या व कागदी घोडे नाचवणाऱ्या मोजक्या अधिकारी व्यक्तींच्या हातात हवे का समाज व देशाची कणव असलेल्या व स्वायतत्ता जपणाऱ्या ध्येयवादी संस्थाचालक, जागरूक नागरिक व त्यास विनाशर्त धन देणाऱ्या दानशूर व्यक्तींचे असावे?
दे शातील शिक्षणसंस्थांचे स्वरूप, रचना कशी आहे, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. या संस्थांच्या स्वायत्ततेचा मुद्दा त्यामुळेच नेहेमी चर्चेत येतो. जगविख्यात हार्वर्ड विद्यापीठाला सरकारचा अर्थपुरवठा थांबवण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या धोरणांमुळे शैक्षणिक संस्थांची स्वायत्तता व एकूणच शिक्षणाचे अर्थकारण हा विषय पुन्हा केवळ अमेरिकेतच नाही तर आपल्या देशातही चर्चेला आला आहे.