Virat Kohli wins first IPL trophy with RCB in 2025 : हा दिवस येईल असे वाटले नव्हते... मी या संघासाठी सर्वस्व दिलं आणि अखेर आज त्याचं फळ मला मिळालं.. यापूर्वी तीनवेळा जेतेपदाचा जवळ पोहोचलो होतो, पण हुलकवाणी मिळाली, विराट कोहली आयपीएल २०२५ ची ट्रॉफी जिंकल्यानंतर मनातल्या भावना व्यक्त करत होता. या त्याच्याच मनातील भावना नव्हत्या, तर RCB च्या कट्टर फॅन्सच्या भावना होता. आज त्यांना विराटने वाट मोकळी करून दिली. आता यापुढे RCB च्या नावाने मीम्स, खिल्ली उडवणारे रिल्स बनणार नाहीत हे खरंय...