
स्वप्ना साने
स्कार्फ, हातमोजे न वापरता उन्हात गेल्यास त्वचा टॅन होते. स्लीव्हलेस ड्रेस असल्यावर पूर्ण हात काळवंडतात. उकाड्यामुळे हाफ पँट, शॉर्ट््स घातली जाते आणि त्यामुळे पाय टॅन होतात. योग्य काळजी घेतली तर टॅन नियंत्रणात ठेवता येऊ शकते.
उन्हाळा आला की आपली त्वचा जरा जास्तच टॅन होते. इतर सीझनमध्येही त्वचा टॅन होतच असते, पण उन्हाळ्यात टॅनबरोबरच त्वचा सनबर्न झाल्याचेही आढळून येते. उष्णतेचा त्रास हल्ली सगळीकडेच वाढलाय, त्यामुळे त्वचा आणि एकुणातच शरीर डिहायड्रेट होते. त्यामुळे उन्हापासून त्वचेला कसे जपता येईल आणि टॅन कसे कमी करता येईल ते पाहू या.