
प्रा. डॉ. संजय छाया त्रिंबकराव खडक्कार
पाणी म्हणजे जीवन. पाणी ही एक मर्यादित नैसर्गिक संपत्ती आहे. पाणी मिळण्याचा एकमेव स्रोत म्हणजे गगनातून धरतीवर बरसणारा निर्भेळ पाऊस. बाकी नदी, तलाव, झरे व विहिरी हे दुय्यम स्रोत आहेत. राज्यात सरासरी वार्षिक पाऊस ४०० ते ६००० मिलिमीटरपर्यंत पडतो. राज्यात वारंवार दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. राज्यातील जवळजवळ ४२.५% क्षेत्र दुष्काळग्रस्त आहे. कारण काही ठिकाणी पाऊस कमी पडतो तर काही ठिकाणी त्या पावसाचे पाणी थांबवण्यासाठी योग्य नियोजनाअभावी वाहून जाते. त्यामुळे तेथे रब्बी पिके घेणे कठीण जाते व पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण होते.