
कल्याणी शंकर
निवडणूक आयोगासोबत विरोधी पक्षांचा सुरू असलेला संघर्ष लवकर निवळेल, असे दिसत नाही. ‘एक व्यक्ती, एक मत’ हे लोकशाहीचे मूलभूत तत्त्व असून ते महत्त्वाचे आहे. विरोधकांनी या प्रश्नाचा योग्य रीतीने वापर करून घेतला आणि नागरिकांना या समस्येची जाणीव करून दिली, तर भाजपलाही गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. निवडणूक आयोगाने सखोल तपासणीनंतर सर्व पक्षांसमोर स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे.
मतदानाच्या आकडेवारीतील बदल आणि ‘मतचोरी’ या गंभीर आरोपांवरून काँग्रेसप्रणित विरोधी पक्ष, सत्ताधारी भाजप युती आणि भारतीय निवडणूक आयोग यांच्यातील संघर्ष गेल्या काही दिवसांपासून वेगाने वाढत चालला आहे.