Election Commission of India SIR
Esakal
पुणे – देशाच्या निवडणूक आयोगाकडून सध्या मतदार पडताळणीची विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. या तपासणीत एक दोन लाख नाही तर कोटींच्या घरात मतदारांची नावे वगळण्यात आली आहे. अद्याप संपूर्ण देशातील राज्यांची तपासणी झालेली नाही. केवळ तीन राज्यांमधील आकडाच हा ९५ लाखांच्या घरात आहे.
एकीकडे जगातील सर्वात मोठी लोकशाही असे भारताचे ब्रॅन्डिंग होत असतानाच दुसरीकडे याच लोकशाहीतील मोठ्या त्रुटी या तपासणीच्या निमित्ताने समोर येत आहेत. मुख्य म्हणजे मागील वर्षभरातपासून देशाच्या विरोधी पक्षाकडून सातत्याने होत असलेला व्होट चोरीचा आरोप, अनेक ठिकाणी आढळून आलेले मतदार याद्यांमधील घोळ या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून होणारी ही पडताळणी लोकशाही आबादित ठेवण्याच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाची ठरते आहे.
पण ही पडताळणी काय आहे, ती किती वर्षांनी केली जाते, तिचे महत्त्व काय आहे, आतापर्यंत कोणत्या राज्यांत ही पडताळणी झाली आहेत, त्याचे आकडे काय सांगतात, निवडणूक विभाग ही पडताळणी कशी करतं, मतदार यादीत नाव नसेल तर काय करायचे आणि याचा पुढील काळात काय परिणाम होऊ शकेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या लेखाच्या माध्यमातून मिळविण्याचा प्रयत्न करूया.