
संजय कुमार
आगामी बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने एक नवा नियम लागू केला होता. त्याअंतर्गत मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा अस्तित्वात असलेले नाव कायम ठेवण्यासाठी नागरिकत्वाचा पुरावा सादर करणे आवश्यक ठरणार होते.
२४ जून रोजी या विशेष पुनरीक्षण मोहिमेची घोषणा करण्यात आली आणि २५ जूनपासून प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात झाली. यात २००३ मधील मतदार यादीला आधार म्हणून घेतले जाणार आहेत. या प्रक्रियेत घरपोच पडताळणी, नवीन दस्तावेजांची अट आणि अंतिम मतदारयादी ३० सप्टेंबरपर्यंत प्रकाशित करण्याचे उद्दिष्ट होते.