

Elon Musk First Trillionaire
esakal
संदीप कामत - saptrang@esakal.com
एलॉन मस्क हे जगाच्या इतिहासातील पहिले ट्रिलियनेअर ठरले. मात्र त्याबद्दल केवळ कौतुक न होता त्यांना प्रचंड टीका सहन करावी लागली. खरेतर मस्क यांचे यश हे एका रात्रीत त्यांना मिळालेले नाही. प्रचंड श्रम आणि चाकोरीबाहेरच्या प्रकल्पांचा विचार करून त्याची उभारणी व त्यातून यश मिळवणाऱ्या या उद्योजकाचा प्रवास स्मार्ट कार्यपद्धतीचा, त्याचबरोबर चोख अंमलबजावणीचा आहे. त्यांच्या आजवरच्या वाटचालीचा वेध...
एलॉन मस्क यांच्या स्पेस-एक्स कंपनीने गेल्या महिन्यात जून २०२६ मध्ये नास्डॅकवर ऐतिहासिक आयपीओ करत पब्लिक कंपनी म्हणून पदार्पण केलं. कंपनीने १३५ डॉलर प्रति शेअर दराने शेअर्स जारी केले आणि ७५ अब्ज डॉलर्स उभे केले. हा अमेरिकन इतिहासातील सर्वांत मोठा आयपीओ ठरला. प्रारंभिक ट्रेडिंगमध्ये शेअर किंमत २० टक्क्यांनी वाढून सुमारे १९२ डॉलरपर्यंत गेली आणि कंपनीची मार्केट कॅप दोन ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेली. साहजिकच एलॉन मस्क हे जगाच्या इतिहासातील पहिले ट्रिलियनेअर ठरले.