Premium|Revenge Quitting in Job: भावनांच्या आहारी जाऊन नोकरी सोडायचा विचार करत असाल तर थांबाच..!

Job Switch in India: सूड भावनेतून नोकरी सोडण्याचा विचार का येतो? भारतातील आकडेवारी काय सांगते? याविषयी तज्ज्ञ काय म्हणतात आणि स्वतःच्या करियरसाठी योग्य निर्णय घेताना कसा विचार करावा.. हे सगळं जाणून घेऊया 'सकाळ प्लस' च्या या विशेष लेखातून...
new job searching in india
new job searching in indiaEsakal
Updated on

पुणे : अपेक्षित पगारवाढ नाही, सहकाऱ्यांशी फारसं पटत नाही, नोकरीत मनासारख्या गोष्टी घडत नाहीत अशी एक ना अनेक कारणांनी वैतागून अनेक कर्मचारी नोकरी सोडण्याचा विचार करतात. यापेक्षा काहीतरी मोठं आणि वेगळं करूया अशी भावना कर्मचाऱ्यांमध्ये बळावते. पण प्रत्यक्षात नोकरीत बदल करणे ही तितकीशी सहजसाध्य होणारी गोष्ट आहे का..?

बदला घेण्याच्या भावनेतून किंवा भावनिक होऊन नोकरी सोडण्याचा ट्रेंड २०२५ या वर्षाच्या सुरुवातीला पाहायला मिळाला. नोकऱ्यांमधील ट्रेंड्स तरी काहीसे हेच सांगत होते. मात्र परिस्थिती अशी असली तरीही प्रत्येकालाच हा निर्णय घेणे शक्य झाले असे नाही कारण वास्तविक परिस्थिती वेगळी होती.

Indeed या भारतातील नोकरीविषयक संकेतस्थळाने याविषयीचा संशोधनपर लेख नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्यात त्यांनी Revenge Quitting विषयी लिहिले आहेत. यामध्ये त्यांनी अनेक अभ्यासाचे दाखले देत म्हंटले आहे की, कोरोना काळ झाल्यानंतर अनेक नोकऱ्यांमध्ये बदल दिसून आले.

मात्र अमेरिकेत झालेल्या एका अभ्यासातून दिसून आले की, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वाढलेला वापर आणि त्यामुळे कामाच्या ठिकाणी झालेले मोठ्या प्रमाणातील बदलांमुळे अमेरिकेतील कंपन्यांनी फारशी पगारवाढ दिली नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये निराशा पाहायला मिळाली. त्यामुळे Revenge Quitting चा ट्रेंड किंवा तशी मानसिकता अनेक कर्मचाऱ्यांमध्ये बळावली. मात्र असे असले तरीही आपल्याला अपेक्षित असणारे पद, त्याला साजेसा पगार मिळविणे कठीण असल्याने अनेक कर्मचारी आहे त्या ठिकाणीच अडकून पडल्याचे 'बिझनेस इन्सायडर' च्या लेखात आकडेवारीनिशी सांगण्यात आले.

सूड भावनेतून नोकरी सोडण्याचा विचार का येतो? भारतातील आकडेवारी काय सांगते? कोणत्या क्षेत्रात याचा प्रभाव अधिक आहे? असा विचार आला तरीही कामाच्या ठिकाणी दूर दृष्टिकोन ठेवत कसा निर्णय घेणे आवश्यक आहे? याविषयी तज्ज्ञ काय म्हणतात आणि स्वतःच्या करियरसाठी योग्य निर्णय घेताना कसा विचार करावा.. हे सगळं जाणून घेऊया 'सकाळ प्लस' च्या या विशेष लेखातून...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com