Premium|Kumbh Mela Nashik 2026 : ‘तपोवना’तील वाट बिकट..!

Tapovan Tree Felling Controversy : नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी तपोवनातील वृक्षतोड आणि 'माईस सेंटर'च्या वादावरून प्रशासन व वृक्षप्रेमींमधील संघर्ष तीव्र झाला आहे.
Kumbh Mela Nashik 2026

Kumbh Mela Nashik 2026

esakal

Updated on

विक्रांत मते

प्रयागराजच्या धर्तीवर नाशिक-त्र्यंबकेश्‍वरचा सिंहस्थ कुंभमेळा साजरा करायचा असल्याने दोन्ही ठिकाणी विकासकामांनी वेग घेतला आहे. विकासकामांनी पकडलेला वेग समाधानकारक असला, तरी निसर्गावर फिरविला जाणारा बुलडोझर पर्यावरणासाठी घातक आहे. लोकभावनेचा विचार न करता सरकारमधील मंत्री व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ‘आम्ही म्हणू तेच’ अशी भूमिका घेतल्याने त्यांच्या मनमर्जीविरोधात जनमताने वृक्षांना कवटाळले. तरीही विकासाचा लेप लावून सरकार-प्रशासनाने कुऱ्हाडीला धार लावण्याचे न सोडल्याने ‘तपोवन’ची वाट बिकट झाली.

देशात चार ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. वादामुळे पेशव्यांनी नाशिक-त्र्यंबकेश्‍वर मध्ये अनुक्रमे वैष्णव व शैवांचे असे स्वतंत्रपणे दोन कुंभमेळ्यांचे आयोजन करण्यास जुन्या काळी परवानगी दिली. ठिकाण दोन असली, तरी नाशिक-त्र्यंबक असा एकच कुंभमेळा आहे. दर बारा वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळ्यासाठी जगभरातून लाखो भाविक येतात. मागील वर्षी जानेवारीमध्ये उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कुंभमेळा पार पडला. तेथील भाविकांची गर्दी लक्षात घेऊन नाशिक-त्र्यंबकेश्‍वरमध्ये पाचपट गर्दीच्या अंदाजाने नियोजन सुरू आहे. त्यासाठी २५ हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत. देश व राज्यात हिंदुत्ववादी सरकार असल्याने खर्चाबाबत सरकारचा हात ढिला सोडला आहे. निधी कमी पडू देणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जाहीर केले असून, त्यांना उत्तर प्रदेशपेक्षा अधिक सरस कुंभमेळा करायचा आहे. साधू-महंतांच्या आखाड्यासाठी ‘साधूग्राम’ वसविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. नाशिक महापालिका हद्दीतील तपोवनात ‘साधूग्राम’साठी ३७६ एकर जागेवर आरक्षण आहे. यातील ९४.०७ एकर जागा महापालिकेच्या ताब्यात आहे, तर २८३ एकर जागेचे संपादन अद्यापपर्यंत झालेले नाही. १३ एकर क्षेत्रात जनार्दन स्वामी मठ व लक्ष्मीनारायण मंदिर गोशाळा आहे. दीड एकर क्षेत्रात अभिन्यास मंजूर आहे. एकूण २६८ एकर आरक्षित जमीन सध्या मालकांच्या ताब्यात आहे.

Kumbh Mela Nashik 2026
Premium| Bangladesh Politics: बांगलादेशात राजकीय अस्थिरतेत वाढ का? त्याचे भारतावर काय परिणाम होतील?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com