
Bangladesh political crisis
esakal
सुरेंद्र पाटसकर
गेल्या वर्षी जुलै-ऑगस्टपासून बांगलादेशामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. खरं तर आर्थिक विकासाच्या वाटेवर त्यांची वाटचाल सुरू असतानाच सामाजिक आणि राजकीय विसंगतींमुळे विद्यार्थ्यांचा असंतोष उफाळून आला. त्याला निमित्त ठरले ते सरकारी नोकऱ्यांतील ‘कोटा पद्धती’चे!
गेल्यावर्षी पाच ऑगस्ट २०२४ रोजी घडलेल्या घटनेने बांगलादेशातील राजकारणाला वेगळे वळण लागले. त्यादिवशी पंतप्रधानपद सर्वाधिक काळ सांभाळणाऱ्या शेख हसीना यांनी देशातून पळ काढला आणि भारतात आश्रयासाठी आल्या.