
डॉ. शैलेंद्र देवळाणकर
चीनची लोकसंख्या दीडशे कोटी असल्यामुळे पाण्याच्या गरजा बिकट बनत चालल्या आहेत. त्यामुळे चीनला पाण्यासाठीच्या योजनांचा धडाका लावावा लागत आहे. नुकतीच भारत-चीन सीमेवर तिबेटमध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंगने ब्रह्मपुत्रा नदीवर जगातले सर्वांत मोठे धरण बांधायला परवानगी दिली आहे.
भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे. ब्रह्मपुत्रा नदीवर महाकाय धरण बांधण्याची चीनची योजना म्हणजे भारताविरुद्ध अघोषित पाणी युद्धच आहे. यामुळे ईशान्य भारताबरोबर बांगलादेशातही दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल. चीन आता भारताची जलकोंडी करण्याचा प्रयत्न करतो आहे. यातून भारत चीनमधील पाणीप्रश्न संघर्षाचे रूप घेण्याची शक्यता आहे.